जागतिक वडापाव दिन आज दणक्यात साजरा होतो आहे. वडापावप्रेमी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वडापाव हे खरे तर गोरगरीब जनता आणि खमंग खाणाऱ्यांच्या जिभेची आणि पोटाची भूक भागवणारा पदार्थ. मुंबई शहरासह महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर तुम्हाला वडापाव सह उपलब्ध होतो. देशभरातही अनेक ठिकाणी आपणास वडापावचे ठेले पाहायला मिळतात. अशा या वडापावचे तुम्ही फॅन असाल तर आपल्या मित्राला नक्कीच शुभेच्छा देऊ शकता. सांगितले जाते की, वडापावचा जन्म 1966 मध्ये दादर स्टेशनबाहेर झाला. अशोक वैद्य नामक विक्रेत्याच्या गाडीव प्रथम वडापाव बनला आणि विकला गेला. त्यानंतर दादर येथील सुधाकर म्हात्रे यांनी वडापाव या पदार्थाची विक्री सुरु केली. तेव्हापासून हा पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहे.

ट्विट

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)