Maha Kumbh 2025: आत्तापर्यंत देश विदेशातील राजकारण्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी महाकुंभमध्ये (Maha Kumbh 2025) सहभाग नोंदवून त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. यात आत साऊथ आणि हिंदी अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने हजेरी लावली. हिंदू धर्मात महाकुंभला मोठे महत्त्व आहे. महाकुंभमध्ये काल विजय देवरकोंडा याने त्रिवेणी संगमला पवित्र गंगा नदीत स्नान केले. त्याने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात तो भगवे कापडे घालून गळ्या रुद्राक्षाची माळ घालून स्नान करत आहेत. '2025 कुंभमेळा, सर्वात प्रिय आईसोबत प्रार्थना', असे कॅप्शन विजय देवरकोंडाने लिहिले आहे. विजयने केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. (‘Chhaava’ Box Office Collection Day 3: विकी कौशलचा 'छावा'ची दमदार कमाई, भारतात 3 दिवसांत 110 कोटींचा व्यवसाय)

विजय देवरकोंडा गंगेत डुबकी 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)