Ganpati Aarti in Marathi: 31 ऑगस्टपासून 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव 31 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर या कालावधीत चालेल. गणपती बाप्पा पहिल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला घरोघरी विराजमान होईल. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला स्वाती नक्षत्र आणि सिंह राशीत मध्यान्हात झाला होता. भाद्रपद गणेश चतुर्थीला विनय चतुर्थी, कलंक चतुर्थी आणि दंड चौथ असेही म्हणतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याठिकाणी मोठमोठ्या मंडळांमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. हिंदू धर्मात, भगवान गणेश हे विद्येचे, बुद्धीचे, अडथळ्याचे, संहारक, शुभ, सिद्धी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाची स्थापना केल्यानंतर Lata Mangeshkar यांच्या आवाजातील आरती गात गणरायची भक्तीभावाने पूजा करा.
गणपती आरती व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)