नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. यंदा तिथी वाढल्यामुळे नवरात्री 8 दिवसांची आली आहे त्यामुळे 14 ऑक्टोबर, गुरुवारी नवमी असेल. नवमीच्या दिवशी देवीच्या पूजेबरोबरच कन्या पूजन देखील केले जाते. असे म्हटले जाते की, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, जो साधक पूर्ण भक्ती भावाने देवीची पूजा करतो तो सिद्धी प्राप्त करतो. देवी सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहे आणि तिच्या हातात कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे. सिद्धिदात्री हे सरस्वती देवीचे रूप आहे, जे आपल्या भक्तांना ज्ञानाने आणि मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करते.नवमीच्या दिवशी मोरपंखी कलरचे कपडे परिधान करावे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)