2024 First Look Out: शनिवारी, 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याआधी विविध मंडळांच्या यंदाच्या गणपतींचे प्रथम दर्शन घडत आहे. नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाचा फर्स्ट लूक समोर आला. त्यानंतर आता मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचेही प्रथम दर्शन भाविकांना घडले आहे. लालबागच्या गणेशगल्लीमध्ये विराजमान होणारा हा गणपती ‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश गल्लीच्या मंडळाचे यंदाचे हे 97 वे वर्ष आहे. मुंबईच्या राजा हा विविध देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. लालबागच्या राजा प्रमाणेच या गणेशगल्लीचा राजा असलेल्या या गणपतीच्या दर्शनालाही लाखो लोक येत असतात. (हेही वाचा; Lalbaugcha Raja 2024 First Look: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक प्रदर्शित, पहा व्हिडिओ)

मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचा फर्स्ट लूक-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)