मुंबई मध्ये गणपतीच्या आगमनानंतर आज (20 सप्टेंबर) पासून गणेश विसर्जनाची लगबग सुरू होईल. आज दीड दिवसांचा नंतर 23 सप्टेंबरला 5 दिवसांचा, 25 सप्टेंबरला 7 आणि 29 सप्टेंबरला 10 दिवसांचा बाप्पा भाविकांची रजा घेणार आहे. अशामध्ये समुद्रावर अनेक भाविक विसर्जनाला येतात. पण मुंबईच्या समुद्रांवर जेली फिश आणि स्टिंग रे पासून सावध राहण्याचा सल्ला बीएमसी ने दिला आहे. दंश झाल्यास काय कराल याची देखील माहिती बीएमसीने जारी केली आहे.
पहा बीएमसीच्या सूचना
मुंबईकरांनो 'स्टिंग रे' आणि 'जेलीफिश' पासून सावधगिरी बाळगा
---
Mumbaikars watch out for 'Stingrays' and 'Jellyfish'#BMCUpdates pic.twitter.com/Xn4mi57iht
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)