सध्या देशात जन्माष्टमीची धामधूम पाहायला मिळत आहे. भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या खास प्रसंगी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील सजवण्यात आले आहे. विमानतळावर उत्स्फूर्तपणे जन्माष्टमीचा सण साजरा झाला. यावेळी कृष्णजन्माचा देखावा साजरा झाला, यासोबतच विमानतळाद्वारे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मुला-मुलींनी मिळून ही दहीहंडी फोडली. महाराष्ट्रात लोक दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. राज्याची राजधानी मुंबईत अनेक दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यासाठी लाखोंची बक्षिसे असतात. (हेही वाचा: Janmashtami 2023: मुंबईच्या ISKCON मंदिरात 3 दिवस साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी; जाणून घ्या महाअभिषेक, महाआरतीसह संपूर्ण कार्यक्रम)

Mumbai Airport Dahi Handi Celebration-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)