Pro Govinda 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी प्रो गोविंदा लीगची घोषणा केली. अशाप्रकारे पुन्हा एकदा जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमांची रंजकता वाढणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर दहीहंडीची प्री-क्वालिफायरही होणार आहे. यासाठी एकूण 32 संघांनी आपली नोंदणी केली असून, 27 ते 28 जुलै रोजी प्री-क्वालिफायरचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये 16 संघ पात्र ठरतील आणि त्यानंतर हे संघ 18 ऑगस्ट रोजी एसव्हीपी स्टेडियमवर मुख्य स्पर्धेत भाग घेतील.

या कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'दहीहंडी कार्यक्रम ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या कार्यक्रमांमध्ये लोक एकत्र येतात आणि कार्यक्रमाचा एक भाग बनतात. अशा स्पर्धांचे आयोजन केल्यास देशभरात दहीहंडीची लोकप्रियता वाढेल. आम्ही अधिकाधिक गोविंदांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करू. या वर्षीच्या प्रो गोविंदाचे उद्दिष्ट दहीहंडीला राज्यात कायदेशीर क्रीडा स्पर्धा म्हणून प्रस्थापित करण्याचे आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना अधिकृत संघात समाविष्ट करण्यासाठी बोलीही लावली जाणार आहे. (हेही वाचा: Paris Olympics 2024 Time And Schedule: पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक, उद्याच पहिला सामना, संपूर्ण स्पर्धेची तारीख आणि वेळ घ्या नोट करुन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)