Mangalagauriche Khel Videos: श्रावण महिना सण समारंभ घेऊन येतो, श्रावण महिन्याला 29 जुलै पासून सुरवात झाली आहे. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी असतो, नागपंचमी पासून श्रावण महिन्यातील सणांना सुरवात होते. श्रावण महिना महिलांसाठी विशेष असतो, नागपंचमीला झोका खेळला जातो. या महिन्यातील सण हे नवविवाहित मुलींसाठी खूपच महत्त्वाचे असतात . कारण श्रावणमध्ये मंगळागौर हा सणही असतो, मंगळागौरीचे व्रत केल्याने नवविवाहितेला अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभाते,अशी धारणा आहे. म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात मंगळागौर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मंगळागौरला वेगवेगळे खेळ खेळत हा सण साजरा केला जातो. लग्नानंतर 5 वर्ष ही मंगळगौर खेळण्याची प्रथा असते. श्रावण महिन्यात यंदा पहिली मंगळागौर पूजा 2 ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर 9,16,23 ऑगस्टला मंगळागौर पूजन केले जाणार आहे. मंगळागौरीचे खेळाचे प्रकार आणि ते खेळण्याची पद्धत माहित करुन घेणार आहोत.[ हे देखील वाचा: Mangala Gauri Puja 2022 Dates: यंदाच्या श्रावण महिन्यात पहा मंगळागौर पूजा कधी करू शकाल?]
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)