Shravan Puja Performed On Railway Tracks: महाराष्ट्रात 5 ऑगस्टला श्रावण सुरु होणार आहे. मात्र, उत्तर भारतीय पंचांगानुसार सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये श्रावण महिना सुरु आहे. गेल्या 22 जुलैला श्रावण मासारंभ झाला. आता व्या श्रावण महिन्यात मुंबईमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. मुंबईमधील चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर भाविक चक्क श्रावण पूजा करताना आढळून आले. प्रवासी चेतन कांबळे यांच्या तक्रारीनंतर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) यामध्ये हस्तक्षेप करून भाविकांना तिथून जाण्यास सांगितले.

अहवालानुसार, भाविकांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांना सांगितले की, पूर्वी या रेल्वे रुळांच्या शेजारी एका देवीचे मंदिर होते आणि ते अस्तित्वात आल्यापासून तेथे असे धार्मिक विधी केले जात आहेत. चेतन कांबळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या पूजेचे काही फोटोज शेअर केले,  ज्यात लोक रेल्वे ट्रॅकवर फुले आणि प्रसाद ठेवताना दिसत आहेत. या व्हिज्युअल्सच्या प्रतिसादात, आरपीएफ मुंबई विभागाने यावावत आवश्यक कारवाई केल्याची पुष्टी केली. आरपीएफने सांगितले की, 30 जुलै 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता, त्यांना चेंबूर स्टेशनच्या कुर्ला एंडला रेल्वे ट्रॅकवर लोक पूजा करत असल्याची माहिती मिळाली. चेंबूर येथे तैनात कॉन्स्टेबल आशुतोष सिंग, जीआरपी वडाळ्यातील कर्मचाऱ्यांसह, तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि भाविकांना ट्रॅक सोडण्यास सांगितले. (हेही वाचा: International Friendship Day 2024: जाणून घ्या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त ग्रीटिंग कार्ड देण्याची प्रथा कशी सुरू झाली)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)