Zepto to Move Headquarters to Bengaluru: आदित पालिचा यांच्या मालकीच्या झेप्टो (Zepto) कंपनीचे मुख्यालय मुंबईतील पवई येथून, भारताची टेक राजधानी बेंगळुरूमधील सर्जापूर येथे हलवण्यात येणार आहे. कंपनीचे आधीच बेंगळुरूमध्ये कार्यालय आहे, परंतु आता कंपनी तिच्या सर्व कॉर्पोरेट भूमिका बेंगळुरूमध्ये हलवण्याचा विचार करत आहे. सध्या या कंपनीचा व्यवसाय मुंबईत आहे आणि तांत्रिक आणि उत्पादन संघ बेंगळुरूमध्ये आहेत. अहवालानुसार, बेंगळुरूला जाण्यास इच्छुक असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदलीचा खर्च कंपनी स्वतः उचलणार आहे. या निर्णयामुळे कंपनीला सुमारे 3-4 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.

अहवालानुसार, झेप्टोला मुंबईहून बेंगळुरूला जाण्यामुळे दरमहा सुमारे 40-50 लाख रुपये भाड्याची बचत होईल असा अंदाज आहे. झेप्टोची भारतात 2 मुख्य कार्यालये आहेत, ज्यात मुंबईत 80,000-90,000 चौरस फूट मालमत्ता आणि बेंगळुरूमध्ये 30,000-40,000 चौरस फूट जागेचा समावेश आहे. कंपनी आता या दोन्ही इमारती सोडणार आहे आणि बंगळुरूमध्ये 1.5 लाख चौरस फुटांची एकाच मोठी मालमत्ता घेणार आहे. यावरून मुंबईमध्ये रिअल इस्टेटच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे. (हेही वाचा; Amazon India Head Manish Tiwary Resigns: ॲमेझॉन इंडियाचे कंट्री हेड मनीष तिवारी यांचा राजीनामा; ऑक्टोबरपर्यंत सांभाळणार पद)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)