Amazon India Head Manish Tiwary Resigns: ॲमेझॉन इंडियाचे कंट्री हेड मनीष तिवारी यांचा राजीनामा; ऑक्टोबरपर्यंत सांभाळणार पद

गेल्या आठ वर्षांत मनीष यांच्या नेतृत्वामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील नाते अधिक घट्ट झाले आहे. त्यांनी ॲमेझॉनला भारतीय बाजारपेठेत ओळख मिळवून देण्यासाठी मदत केली.

Amazon India Head Manish Tiwary Resigns: ॲमेझॉन इंडियाचे कंट्री हेड मनीष तिवारी यांचा राजीनामा; ऑक्टोबरपर्यंत सांभाळणार पद
Amazon (PC - Pixabay)

Amazon India Head Manish Tiwary Resigns: अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचा भारतीय व्यवसाय सांभाळणारे मनीष तिवारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल 8 वर्षांनंतर मनीष तिवारी यांनी ॲमेझॉन इंडियाचे कंट्री हेड पद सोडले आहे. आता ते दुसऱ्या कंपनीत नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत. मात्र ते कोणत्या कंपनीत जाणार आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ॲमेझॉनच्या प्रवक्त्याने मनीष यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे. गेल्या आठ वर्षांत मनीष यांच्या नेतृत्वामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील नाते अधिक घट्ट झाले आहे. त्यांनी ॲमेझॉनला भारतीय बाजारपेठेत ओळख मिळवून देण्यासाठी मदत केली. आता राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या नवीन परिवर्तनात मदत करण्यासाठी मनीष तिवारी ऑक्टोबरपर्यंत ॲमेझॉनमध्ये काम करतील. (हेही वाचा; Mukesh Ambani's Reliance Makes History: मुकेश अंबानींच्या रिलायन्सने रचला इतिहास; फॉर्च्यून ग्लोबल लिस्टमध्ये तब्बल 21 वर्षे कंपनीचा दबदबा कायम)

पहा पोस्ट- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2024 06:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).