Kanpur: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर एका तरुणाने १७ वर्षीय तरुणीला तिचे तुकडे करण्याची धमकी दिली. मोहम्मद फैज असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद फैजला कानपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला न्यायालयात हजर करून कारागृहात पाठवले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल डीजीपी मुख्यालयाला पाठवण्यात आला असून पोलीस आता संपूर्ण कुटुंबाचा गुन्ह्याचा इतिहास शोधत असून या सर्वांचा पोलीस रेकॉर्डमध्ये समावेश करण्याची तयारी करत आहेत. हे संपूर्ण प्रकरण शहरातील नौबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. (हेही वाचा - Delhi Crime: हत्याकांडानं राजधानी दिल्ली पुन्हा हादरली! नवऱ्याचा खुन करत आफताबच्या पॅटर्नने लावली मृतदेहाची विल्हेवाट; पहा व्हिडीओ)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)