Telangana News: तेलंगणामध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. 2023च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दुडिल्ला श्रीधर बाबू यांच्या विजय झाल्यानंतर समर्थक ट्रॅक्टरवर स्टंट करत होते. दरम्यान ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने कॉंग्रेस पक्षाच्या समर्थकाला गंभीर दुखापत झाली. ही घटना तेंलगणातील मंथनी येथे घडली आणि परिसरात ट्रॅक्टरवर विजयी झाल्यानंतर मिरवूक काढली. दरम्यान ट्रॅक्टरचा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे ज्यात वेगात डावीकडे वळण घेण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर समर्थक पडताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)