Tigress Meera Gave Birth To 3 Cubs In Gwalior Zoo: मध्य प्रदेशात वाघांची संख्या वाढत आहे. ग्वाल्हेर प्राणीसंग्रहालयातून पुन्हा एकदा चांगली बातमी समोर आली आहे. पांढरी वाघीण मीरा (White Tigress Meera) ने तीन शावकांना जन्म दिला आहे. तीनही शावक सुरक्षित आणि निरोगी आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या गांधी प्राणी उद्यानात सोमवारी मीरा या पांढऱ्या वाघिणीने तीन शावकांना जन्म दिला. प्राणिसंग्रहालय व्यवस्थापन या तिघांची काळजी घेत आहे. महापालिका आयुक्त हर्ष सिंह यांनी सांगितले की, तीन पिल्लांपैकी दोन 'मीरा'सारखे पांढरे आहेत, तर एक शावक पिवळ्या रंगाचा आहे. नवीन शावकांच्या जन्मामुळे ग्वाल्हेर प्राणीसंग्रहालयातील शावकांची संख्या 9 झाली आहे. 39 दिवसांपूर्वी प्राणीसंग्रहालयातील ‘दुर्गा’ या वाघिणीने तीन शावकांना जन्म दिला होता. सध्या प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या 12 झाली असून त्यापैकी 5 वाघ पांढऱ्या रंगाचे आहेत.
पहा व्हिडिओ -
#WATCH ग्वालियर (मध्य प्रदेश): सफेद बाघिन मीरा ने कल रात तीन शावकों को जन्म दिया।
(वीडियो सौजन्य: चिड़ियाघर प्रबंधन) pic.twitter.com/Jhm8th5DLG
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)