Vlogger Sexual Harassment Case in Kerala: एक अमेरिकन महिला व्लॉगर 19 एप्रिल रोजी त्रिशूर पूरम उत्सवात सहभागी होण्यासाठी केरळला पोहोचली होती. यावेळी एका बाबाने महिलेसोबत गैरवर्तन केले. महिलेचा आरोप आहे की, त्रिशूर पूरम उत्सवादरम्यान तिला लैंगिक छळाचा सामना करावा लागला. महिलेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या प्रकरणाचा व्हिडिओ पोस्ट केला होता, जो वेगाने व्हायरल झाला. आता माहिती मिळत आहे की, या परदेशी व्लॉगरशी गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगाराला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तानुसार, कथित छळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अलाथूर पोलिसांनी सुरेश उर्फ मधूला ताब्यात घेतले. सुरेशला अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्रिशूर पूर्व पोलिसांच्या ताब्यात दिले.
अमेरिकन-इंग्रजी व्लॉगर जोडपे मॅकेन्झी आणि कीनन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचे वर्णन केले होते. व्हिडिओमध्ये एक माणूस मॅकेन्झीशी बोलल्यानंतर तिचे जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये कीननने असेही म्हटले आहे की, एका पन्नाशीमधील व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. (हेही वाचा: UP Shocker: प्रेम करण्याची तरुणाला मिळाली तालिबानी शिक्षा; गावकऱ्यांनी केली मारहाण, चपलांचा हार घालून काढली धिंड, लघवीही प्यायला लावली)
पहा पोस्ट-
#Kerala : The culprit who misbehaved with a foreign vlogger during the Thrissur Pooram has been arrested.
The Alathoor Police, who took Suresh alias Madhu into custody, later handed him over to the Thrissur East Police.
The vlogger had earlier revealed her unpleasant incident…
— South First (@TheSouthfirst) May 15, 2024
पहा व्हिडिओ-
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)