Viral Video:  रिल्स बनवण्यासाठी तरुण  काय काय उद्योग करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी जावून रिल्स बनवतात. कधी रेल्वे स्टेशन वर तर कधी पेट्रोल पंपवर. रिल्स बनवणाऱ्या तरुणांचा कधी काय करतील याचा नेम नसतो. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणाने चक्क पेट्रोल पंपवर जावून कहर केला आहे. युजर्सनी या तरुणाला चांगलंच सुनावले आहे, उत्तर प्रदेशातील आमरोह परिसरातील तरुणाने पेट्रोल पंपवर बुलेट गाडीला पेट्रोल टाकून आंघोळ घातली आहे. एकीकडे पेट्रोल महाग होतोय  त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आणि दुसरीकडे तरुणी पीढी त्यांची नासाडी करत आहे.  पोलिसांना ही घटना कळताच सदर व्हिडिओतील तरुणाला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)