Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला. दंतेवाडाच्या अरनपूरमध्ये ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनीही नक्षलवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या नक्षलवादी हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहेत. (हेही वाचा - Dantewada Shaheed Jawan Names: दंतेवाडा मधील शहीद 10 जवान 1 वाहन चालकाच्या नावाची यादी जारी)
#WATCH | Viral video surfaces showing moments after Dantewada Naxal attack in Chhattisgarh
(Source: Unverified) pic.twitter.com/6UXfOOhz5c
— ANI (@ANI) April 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)