प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. तत्पूर्वी प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांप्रमाणेच त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र आज त्यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून लता दिदिंना श्रद्धांजली वाहिली आहे.
युग संपले... pic.twitter.com/prMUOK74oW
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)