UP Crime : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील मेरठमध्ये गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं दिसत आहे. कारण एका मजुराने (Labour) 800 रुपयांच्या थकबाकीची मागणी केली असता त्याला जोरदार मारहाण (Beat) करण्यात आली आहे. गुंडांनी तरुणाला रस्त्यावरून उचलून घरात कोंडले आणि मारहाण केली. मारहाण केल्यानंतर गुंडांनी त्या तरुणाला पुन्हा रस्त्यावर फेकले. तरूणाला उचलून नेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. (हेही वाचा :Uttar Pradesh Crime: खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला, मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली; उत्तर प्रदेशमधील घटना )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)