दरवर्षी अनेक परदेशी पर्यटक भारताला भेट देतात. त्यांच्याकडून नेहमीच देशाच्या नैसर्गिक सौंदर्याचे, इथाल्याब इतिहासाचे तसेच आपल्या ऐतिहासिक व्यक्तींच्या शौर्याचे कौतुक होते. महाराष्ट्रातही, परदेशी पर्यटक रायगड, राजगड, शिवनेरी इत्यादी किल्ल्यांना भेटी देतात. आता राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यातून याबाबत एक संतापजनक घटना समोर आली आहे. नुकतेच एका न्यूझीलंडमधील पर्यटकाने पुण्याला भेट दिली. यावेळी तो शहराच्या बाहेरील सिंहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेला. या ठिकाणी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि वारशाच्या कथा सांगण्याऐवजी, तरुणांच्या एका गटाने मराठीत अश्लील शिव्या शिकवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या परदेशी पर्यटकाला मराठी तरुणांचा एक गट अश्लील शिव्या शिकवून, त्या इतरांना देण्यास सांगत आहे. या लज्जास्पद घटनेमुळे ऑनलाइन संताप व्यक्त होत आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे. या तरुणांवाई कठोर कारवाईची मागणीही होत आहे. विदेशी पाहुण्यांसमोर आपल्या भारतीय संस्कृतीला कलंकित करणाऱ्या या लोकांना कायद्यानुसार कडक शिक्षा झाली पाहिजे, असे वापरकर्ते म्हणत आहेत. (हेही वाचा: India's Got Latent Controversy: पुन्हा एकदा रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांच्या अडचणीत वाढ; आता महाराष्ट्र सायबर पोलीस करू शकतात कारवाई, जाणून घ्या कारण)

सिंहगड किल्ल्यावर न्यूझीलंडच्या पर्यटकाला मराठी तरुणांनी शिकवल्या अश्लील शिव्या:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)