Truck Cathces Fire: मध्य प्रदेशातील दमोह -जबलपूर राज्य महामार्गावर टायरने भरलेल्या ट्रकच्या इंजिनला आग (Fire) लागल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असवी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत सुदैवाने ट्रकचालक आणि त्याचा मित्राने वेळी घटनास्थळावरून पळ काढत जीव वाचवला आहे. आग लागताच दोघांन्ही घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, आगीत संपुर्ण ट्रक जळून खाक झाले आहे. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरत आहे. (हेही वाचा- अनियंत्रित बाईक दुभाजकाला धडकली, पूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)