Tiger Attacked On Farmer: उत्तर प्रदेशातील दक्षिण खेरी वन विभागात वाघाच्या हल्ल्यात 45 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. गेल्या तीन आठवड्यांतील अशा प्रकारची ही सहावी घटना आहे. मोहम्मदी वन परिक्षेत्रापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या बोझवा गावात पीडित अयोध्या प्रसाद हा त्याच्या उसाच्या शेतात काम करत होता. रविवारी वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी त्याला वाचवले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा - Tiger Kills Man in Chandrapur: नागभीड वन परिक्षेत्रातील पान्होडी गावात 65 वर्षीय व्यक्तीवर वाघाचा हल्ला; विद्रुप अवस्थेत सापडला मृतदेह)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)