Ram Mandir Pranpratishtha: अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. आता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या मुख्य पुजाऱ्यांनी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराचा अभिषेक सोहळा आणि त्यापूर्वीच्या विधींची माहिती दिली आहे. आचार्य सत्येंद्र दास यांनी माहिती दिली आहे की, “प्राणप्रतिष्ठा हा एक व्यापक विधी आहे, म्हणून 15-16 जानेवारीपासून पूजा सुरू होईल, जेव्हा 14 जानेवारीला खरमास संपेल. तसेच मूर्ती एकतर 'नगरभ्रमण' किंवा 'परिसर ब्रम्हण' साठी नेली जाईल. त्यानंतर, इतर विधीही पाळले जातील... प्राणप्रतिष्ठेच्या आधी या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. मुख्य समारंभात फक्त मुख्य कार्यक्रम होईल. त्याच दिवशी पंतप्रधानही येतील..." (हे देखील वाचा: Ram Flag 13000 Feet In Sky: 22 वर्षीय Anamika Sharma ने 13 हजार फीट वरून स्कायडायव्हिंग करत फडकवला 'जय श्री राम' चा झेंडा (Watch Video)
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | Chief Priest of Ram Janmabhoomi Teerth Kshetra, Acharya Satyendra Das gives details on the pranpratishtha ceremony of Ram Temple and the rituals before that.
He says, "Pranpratishtha is an extensive ritual so the puja will begin from 15-16… pic.twitter.com/wLiDBs1lgt
— ANI (@ANI) January 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)