तेलंगणातील एका दुर्दैवी घटनेत कुकटपल्ली येथे एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना एल्विन कॉलनीतील पाईप लाईन रोडवर असलेल्या प्रेम सरोवर अपार्टमेंटमधील आहे. 40 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक महिला निवासी इमारतीच्या तळघरात शिरताना दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसे ती महिला ओल्या फरशीवरून स्विचबोर्डच्या दिशेने चालताना दिसत आहे. महिलेने बोअर चालू करताच तिला विजेचा धक्का बसला आणि ती जमिनीवर पडली. विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हे देखील वाचा: Bengaluru Uber Driver Attacks Woman: उबर कॅब चालकाचा महिलेवर हल्ला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)