Uber Driver Attacks Woman | (Photo Credit - Twitter)

Uber Driver Misbehavior With Woman: उबर कॅब चालक एका महिलेवर हल्ला करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बंगळुरु (Bengaluru) शहरातील भोगनहल्ली येथील असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मारहाण केले प्रकरणी महिलेने पोलिसांमध्ये चालकाविरोधात तक्रार दिली आहे. ज्यात महिला आणि तिच्या मुलाला आरोपीने मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. अजय अग्रवाल नामक व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. त्यानंतर ही घटना चर्चेत आली.

अजय अग्रवाल नामक व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, व्हिडिओतील पीडित त्याची पत्नी आणि मुलगा आहे. इमातीच्या फाटकासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे फाटकाजवळ असलेल्या नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केला. ज्यामुळे माझी पत्नी आणि मुलाचा जीव वाचला. (हेही वाचा, Uber Cab चालक मुंबई-पुणे एक्सप्रेस वर गाडी चालताना डुलक्या काढत असल्याने प्रवासी तरूणीला चालवावी लागली गाडी (Watch Video))

अजय अगरवाल सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणतात, पत्नी आणि मुलाला वैद्यकीय उपचारासाठी मणिपाल हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आपण कॅब बुक केली होती. नोंदणी वेळेनुसार कॅब सकाळी 11.05 वाजता आली. दोघेही कॅबमध्ये बसले. पण, लगेच त्यांना लक्षात आले की, ते चुकीच्या कारमध्ये बसले आहेत. आपण बुक केलेली कार ही नव्हे. त्यामुळे त्यांनी लगेच कारचालकाला याची कल्पना दिली. त्यांनी कारमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण, कारचालक संतापला. त्याने त्यांना कारमधून खाली उतरण्यास मज्जाव केला. तसेच जबरदस्तीने कार चालवतच राहिला. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत मुलाने कार चालकांला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पत्नी आणि मुलावर हल्ला केला. दरम्यान, पत्नी, मुलाचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी हस्तक्षेप केला आणि दोघांना वाचवले.

व्हिडिओ

दरम्यान, कार चालकाकडून घडलेल्या कथीत मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा अजयने केला आहे. अजयने केलेली तक्रार पलिसांनी नोंदवून घेतली आहे. तसेच, कारचालकाला ताब्यात घेतलेआहे. बेलंदूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ड्रायव्हरचा दावा आहे की, महिला तिच्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर कार पार्क केल्यामुळे संतापली. महिलेने आपल्याला शिवीगाळ केली आणि कारमधून उतरताना तिने कारचा दरवाजा जोरात ठोकला. त्यानंतर आमच्यात वादावादी झाली.