Representational Image |(Photo credits: PTI)

पुणे-मुंंबई प्रवासादरम्यान उबर कॅब (Uber Cab) कंपनीच्या वाहनाचा चालकच डुलकी काढत असल्याने महिला प्रवाशाला स्वतः गाडी चालवत मुंबईमध्ये यावं लागलं आहे. दरम्यान हा प्रकार 21 फेब्रुवारी दिवशी घडला असून अद्याप प्रवाशाला उबर कंपनीकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचं महिला प्रवासीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान TOI ला प्रतिक्रिया देताना तिने दिलेल्या माहितीनुसार, "पालकांना भेटून पुण्यावरून मुंबईला परतताना हा प्रकार घडला. कॅब ड्रायव्हर गाडी चालवतानाच डुलकी काढत होता. त्याला इतकी झोप अनावर होत असून दोन वेळेस अपघात होता होता वाचला." 12 दिवस उलटले तरीही अद्याप उबर कॅबकडून याबाबत चालकावर काय कारवाई झाली? किंवा इतर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा तरूणीचा दावा आहे.

विशीमध्ये असलेली ही प्रवासी चार मोठ्या बॅग्स आणि लॅपटॉपसोबत मुंबईच्या दिशेने निघाली होती. दरम्यान ड्रायव्हरला सांभाळून गाडी चालवं असं म्हटलं. त्यानंतर ती वडिलांशी फोनवर बोलायला लागली. पहिला टोल नाका पार झाल्यानंतर गाडी दोना अपघाट सदृश्य स्थितीमध्ये सापडली. एकदा गाडी पुढच्या कारला धडकणार होती तर एकदा डिव्हायरडरला आपटली. या प्रकारानंतर एक्सप्रेस वे वर गाडीमधून उतरून दुसरी कॅब मिळणं शक्य नसल्याने तिने ड्रायव्हर सीटवरे बसून गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही कार चालक झोपण्याऐवजी फोनवर चॅटिंग करता होता. थोड्यावेळाने तो झोपला आणि कार अंधेरीला पोहचण्याआधी 20 मिनिटं तो उठला. मुंबई-पुणे महामार्गावर टोलच्या दरात येत्या 1 एप्रिलपासून वाढ, वाहनचालकांना बसणार फटका

तरूणीसोबत घडलेल्या सार्‍या प्रकाराची तिने उबर कॅब अ‍ॅपवर तक्रार नोंदवली. मात्र तो सविस्तर लिहण्याची सोय नव्हती. त्यानंतर तिने ट्विटरवर हा प्रकार सांगितला. त्यानंतर उबर प्रतिनिधीकडून फोन आला आणि हा प्रकार पुन्हा होणार नाही इतकीच ग्वाही देण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाकडून करण्यात आलेल्या इमेलला उत्तर देताना उबर कॅबकडून हा प्रकार चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. तसेच संबंधित चालकाचं अ‍ॅपचं अ‍ॅक्सेस रद्द करण्यात आल्याचं म्हटलं आहे.