Seema Haider In Ram Bhakti: पाकिस्तानातून उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलेल्या सीमा हैदरही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्री राम प्राण प्रतिष्ठापूर्वी, सीमा हैदरने जय श्री रामाचा जयघोष नारा लावला आहे. सीमा हैदरच्या मुलाने हनुमान चालिसाचे पठण केले आहे. या वेळीसचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. सीमा हैदर आणि तीच्या मुले महाराणा प्रताप सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहाभागी झाली. डोक्यावर भगवा टोपी परिधान करून सीमा हैदरने श्री राम प्रभूंचे भजन गायले आणि तिच्या मुलांनी हनुमान चालिसाचे पठण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीमा हैदर आपल्या मुलांना सनातन धर्माचे ज्ञान देत असल्याचे सांगत आहे. यावेळी सीमा हैदर आणि सचिनसोबत वकील एपी सिंहही उपस्थित होते. त्यांनी श्री राम प्राण प्रतिष्ठा दिन साजरा केला. सीमा हैदर यांनी हनुमान चालिसाचेही वाटप केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)