UP Shocker: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मेढा येथील शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. शाळेला कुलुप लावून शिक्षण घरी गेले परंतु एक अल्पवयीन मुलगा शाळेतच राहिला. मुलाने रडण्यास सुरुवात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गावकऱ्यांनी या मुलाची सुटका केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली. कारवाई करत शिक्षण विभागाचे प्रभारी मुख्याध्यापिका जुली कुमारी यांना निलंबित करण्यात आले. याशिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी अरुणकुमार अवस्थी यांना या समितीचे तपास अधिकारी करण्यात आले आहे. शिक्षकांच्या या निष्काळजीपणामुळे गावात शिक्षण संस्थेवर प्रश्न उभा केला जात आहे. (हेही वाचा- मुंबईमधील महालक्ष्मी मंदिराने पुन्हा सुरु केली हिंदू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती; जाणून घ्या सविस्तर)
जल्दी में बच्चे को स्कूल में बंद कर निकल गये टीचर. मामला यूपी के प्रयागराज का है.
— Priya singh (@priyarajputlive) July 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)