Same-Sex Couple Married in Gurugram:  दोन्ही महिलांचा कुटुंबीय आणि 80 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. 3 एप्रिल 2024 रोजी गुरुग्राममधील धर्मशाळेत समलिंगी विवाह झाला होता. दोघी 4 वर्षांपासून नात्यात होत्या. अंजू शर्मा आणि कविता टप्पूअसे त्यांची नावे आहेत. कविता वराच्या भूमिकेत होती.सुखद बाब म्हणजे दोघींच्याही कुटुंबीयांनी हे नाते आनंदाने स्वीकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये अंजूने हरियाणातील फतेहाबाद येथील कविता या मेकअप आर्टिस्टला नोकरीसाठी ठेवले होते. ती अंजूसोबत तिच्या यूट्यूब चॅनलच्या शूटसाठी काम करत होती. अंजू एक अभिनेत्री असून सध्या मुंबईत काम करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)