Manali Rain Video:  हिमाचल  प्रदेशात (Himachal Pradesh) अचानक पुर (Flood) आल्याने नागरिकांने नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात अचानक काही भागात पुर आला. भारतीय हवामान खात्याने (IMD), हिमाचल प्रदेशातील  मनाली, कुल्लू, सोलन या भागात मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचते याबाबत काही भागात यासंदर्भात हवामान खात्याने चेतावनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पावासाने हजेरी लावली. पुर आल्यामुळे NH 3  रस्ता बंद केला आहे. पुरामुळे काही भागातील घरे, हॉटेल वाहून गेल्याचे दृश्य दिसले. मनाली रोहटांग परिसरात मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचले आहे. परिणामी नागरिकांना याचा त्रास झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)