भारतासह संपूर्ण जगात उद्या (26 मे 2021) बौद्ध पौर्णिमा ( Buddha Purnima 2021) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने उद्या सकाळी 09:45 वाजता होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे बीजभाषण होणार आहे. संस्कृती मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात, जगभरातील सर्व बुद्धिस्ट संघांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. तसेच जगभरातील प्रमुख बौद्ध धर्मपीठांमधील 50 पेक्षा जास्त धर्मिक मार्गदर्शक या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत. ट्वीट-
Prime Minister @narendramodi to deliver the keynote address on the occasion of #VirtualVesak Global Celebrations on #BuddhaPurnima
Details:https://t.co/UE1FUlsXH9 pic.twitter.com/0xv70KvEgW
— MIB India 🇮🇳 #StaySafe (@MIB_India) May 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)