BSP MP Danish Ali यांचं मायावती यांनी पक्षातून निलंबन केलं आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याचं कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बसपाने दानिश अली यांना अनेक वेळा सूचना दिल्या होत्या आणि त्यांच्या मुद्द्यावर पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते, मात्र तरीही दानिश अली सतत काँग्रेससोबत उभे असल्याचे दिसले. याच कारणावरून आता अखेर त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे. दानिश यांना भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी शिवराळ भाषेत संबोधले होते तेव्हापासून ते संसद परिसरात या घटनेचा निषेध करत त्यांच्या सदस्यता रद्द करण्याची मागणी करत आहेत. Nana Patole On MP Ramesh Bidhuri: भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून निषेध .
पहा ट्वीट
Bahujan Samaj Party (BSP) suspends its MP Danish Ali for indulging in anti-party activities: BSP pic.twitter.com/BKHHuVbStw
— ANI (@ANI) December 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)