Nana Patole | (Photo Credits: X)

Ramesh Bidhuri Remark: भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी बसपा खासदार दानिश अलि (BSP MP Danish Ali) यांच्या उद्देशून केलेल्या वक्तव्यावरुन देशभरात वाद सुरु आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही भाजप (BJP) खासदाराच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या खासदारांनी ज्या पद्धतीने शिवीगाळ केली. त्याचा आम्ही तीव्र विरोध आणि निषेध करतो. भाजपने अजूनही आपली मानसिकता बदलावी. हा देश लोकशाही मार्गावर चालणारा आहे. जर कोणी भर संसदेत अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर ते लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

भाजप खासदाराने भर संसदेमध्ये जोरदार शिवीगाळ केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने या खासदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करणारे रमेश बिधूडी यांना ही नोटीस बजावण्यात आली असून, त्यांनी बसपा खासदार दानिश अली यांना एका मिनीटामध्ये जवळपास 11 शिव्या दिल्या आहेत. ज्यामध्ये 'भडवा', 'दहशतवादी', 'मुल्ला', 'कटुवा' (तुटका, कापलेला) अशा शब्दाचा उल्लेख केला आहे. बसपा सुप्रिमे मायावती, काँग्रेस आणि आरडेडी यांसह अनेक पक्षांनी या विधानांवर जोरदार आक्षेप घेतला आहे. तसेच, सदर खासदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. भाजप आता त्यावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपने खासदारास नोटीस बजावण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी बुधुरी यांना कडक शब्दांमध्ये समज दिली आहे. जर यापुढे अशा प्रकारचे वर्तन करताना आढळलात तर आपल्यावर कडक कारवाई केली जाईल. दक्षिण दिल्ली येथून येणारे रमेश बिधुरी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत आले आहेत. त्यांच्या अनेक विधानांमुळे जोरदार वाद या आधीही झाला आहे. आता तर त्यांनी थेट संसदेमध्येच अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. त्यांनी भाषेच्या सर्व मर्यादा पार केल्या. इतकेच नव्हे तर त्यांची मजल इथपर्यंत गेली की, त्यांनी चक्क समोरच्या खासदाराला तुम्हाला मी बाहेर बघून घेतो अशी धमकी दिली.

ट्विट

या सर्व प्रकारानंतर बसपा खासदार दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीले. ज्यामध्ये म्हटले आहे की, लोकशाहीच्या मंदिरामध्ये मला शिव्या देण्यात आल्या. या प्रकरणी एक विशेषाधिकार समिती स्थापन करण्यात यावी तसेच रमेश बिधूडी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.