PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आरबीआय (RBI) च्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस (Mumbai Police) बंदोबस्त आणि सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्यावतीने ट्वीट करत वाहतुकीसंबंधीच्या मार्गदर्शक सूचना (Traffic Advisory) देण्यात आल्या आहेत. ज्यात, इंदु क्लिनिक जंक्शन (सैय्यद जमादार चौक) पासून वोल्गा चौकापर्यंत रामभाऊ साळगावकर रस्त्याच्या विस्तार पाहता दोन्ही दिशांच्या वाहनांसाठी प्रवेश खुला असेल. याशिवाय जमनालाल बजाज मार्ग ते उषा मेहता चौकापर्यंत मेकर टॉवर 4 पर्यंतचा भाग दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुला असेल. शहरातील खालील महत्त्वाच्या रस्त्यांवर पार्किंगचे निर्बंध दुपारी दोन वाजेपर्यंत लागू असतील. (हेही वाचा :PM Modi In Azamgarh: 'मोदी दूसरी मिट्टी का इंसान है...', पंतप्रधान मोदींनी आझमगडमधील सभेत विरोधकांवर साधला निशाणा, (Watch Video) )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)