केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी भारतात कोरोना विषाणूच्या XE व्हेरिएंटचे पहिले प्रकरण आढळून आल्याचा दावा करणारे वृत्त फेटाळून लावले. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, मुंबईत कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णाची ओळख पटल्याचा दावा बीएमसीकडून करण्यात आला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘कोविड विषाणूचे अनुवांशिक सूत्र शोधण्यासाठी 230 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 228 रुग्णांमध्ये ओमिक्रॉन प्रकारांची पुष्टी झाली आहे. एका रुग्णाला 'XE' ची लागण झाली आहे.

मात्र, आता आरोग्य मंत्रालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बीएमसीचा हा दावा फेटाळून लावला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की रुग्णाच्या नमुन्याच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये XE व्हेरिएंटची उपस्थिती दर्शवत नाही.[Poll ID="null" title="undefined"]

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)