ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आपली पदके गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला पोहोचले होते, मात्र त्यांनी आज पदके गंगेत सोडली नाहीत. वृत्तानुसार, शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्या समजुतीनंतर कुस्तीपटूंनी आज पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला. यावेळी कुस्तीपटूंनी आपली पदके नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केली. कुस्तीपटू हरिद्वारला पोहोचल्यानंतर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंचे मन वळवण्यासाठी हरिद्वार गाठले. नरेश टिकैत यांनी मध्यस्थी करून त्यांच्याकडे पाच दिवसांची मुदत मागितल्यानंतर आंदोलक कुस्तीपटू हरिद्वारहून परतले. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल निषेध म्हणून कुस्तीपटू आपली पदके गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी जमले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)