उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने शुक्रवारी दाणादाण उडवली. रस्त्यारस्त्यांवर पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अनेक रस्त्यांवर 4 ते 5 फूट पाणी साचल्याने गाड्या आधी रांगू लागल्या आणि नंतर तरंगू लागल्या. दिवसभर ठिकठिकाणी भीषण वाहतूककोंडी कायम राहिली. मुसळधार पावसामुळे हरिद्वारमधील रस्ते पाण्याने भरले आहेत. त्यामुळे वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत. मुसळधार पावसानंतर रस्ते पाण्याने तुडुंब भरल्याने वाहने पाण्यात तरंगत आहेत. हरिद्वारमधील खारखारीजवळ मुसळधार पावसामुळे पाण्यात अडकलेल्या वाहनांना एसडीआरएफने रेस्क्यू केले.
पाहा व्हिडिओ-
#WATCH | Haridwar, UP: SDRF rescues vehicles caught in water due to heavy downpour near Kharkhari in Haridwar.
(Source: SDRF) pic.twitter.com/Pg5g6GS841
— ANI (@ANI) June 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)