Jamtara, July 18: झारखंडच्या जामतारा येथे एका धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने लग्नानंतर जीन्स घालण्यापासून रोखल्यामुळे पतीचा  भोसकून खून केला आहे. जामतारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोरभिठा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री पुष्पा हेंब्रम ही तरुणी जीन्स घालून गोपालपूर गावात जत्रा पाहण्यासाठी गेली होती. जेव्हा ती घरी परतली, तेव्हा या जोडप्यात जीन्समुळे जोरदार भांडण झाले होते आणि पत्नीने लग्नानंतर जीन्स का घातली असा प्रश्न पतीने विचारला, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात पुष्पाने तिच्या पतीवर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मृताचे वडील कर्णेश्वर तुडू यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आणि सून यांच्यात जीन्स घालण्यावरून वाद झाला होता. "मारामारीदरम्यान पत्नीने पतीला भोसकले," असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जामतारा स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) अब्दुल रहमान यांनी सांगितले की, धनबादमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे कारण धनबादमध्ये उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. [हे देखील वाचा :- Pune: स्कूलबस चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल]

 मिळालेल्या माहितीनुसार, जोडभिटा या गावातील आंदोलन तुडू याचे दोन महिन्यांपूर्वी पुष्पा हेंब्रमसोबत लग्न झाले होते.  जीन्स घालून जत्रा पाहायला जाऊ नका असे पतीने सांगितले. याचाच राग आल्याने पत्नी पुष्पा हेंब्रम हिने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला. त्यानंतर  कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)