Pune: स्कूलबस चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Abuse | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Abuse) धक्कादायक घटनेने पुणे (Pune) हादरले आहे. पुण्यामध्ये एका स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे खळबळजनक वृत्त पुढे येत आहे. रिलेशनशिपमध्ये राहू असे सांगत या चालकाने पीडितेशी जवळीस साधली. त्यातून त्याने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात आणि एकूणच शरहात चिंता व्यक्त केली जातानाच  पुण्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्याही सुरक्षेचा प्रश्न जोरदार चर्चेला आला आहे. आरोपी विरोधात कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa police station) गुन्हा नोंद झाला आहे.

पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहू असे सांगत या चालकाने मुलीशी जवळीक वाढवली तेव्हा तिला रिलेशनशिप म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हते. त्याचाच गैरफायदा घेत चालकाने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले. आरोपीने पीडितेला मार्च आणि जूनमध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेऊन तिच्यावर बल्ताकार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (हेही वाचा, Crime: मालाडमध्ये शेजारी झोपू न दिल्याने पत्नीची हत्या, नंतर पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण)

कोंढवा पोलिसांनी पोस्को अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोमेश्वर घुळे पाटील वय ३५ रा वडाची वाडी असं या आरोपीचं नाव आहे. चालक हा पीडित मुलीला त्याच्या स्कूलबसमधून शाळेतून घरी आणत असे आणि नेऊन सोडत असे. या वेळी दोघांमध्ये ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेवर अत्याचार केले.

पीडितेला तिच्यासोबत काय चालले आहे हेसुद्धा कळत नव्हते. एके दिवशी तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा भांडोफोड झाला. आईने पीडितेला घेऊन कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि थेट तक्रार दिली. कोढवा पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तपास सुरु केला आहे.