Wife, No Sex and Police: मुजफ्फरपूरमध्ये पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांबाबत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध शारीरिक संबंध न ठेवल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. महिलेने सांगितले की, लग्नानंतर पतीने एकदाही सेक्स केला नाही. पत्नीने तरुणाविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पत्नीने एफआयआरमध्ये सांगितले की, तिचे लग्न 31 मे 2021 रोजी झाले होते. मात्र लग्न झाल्यापासून आजतागायत तिच्या पतीने तिच्याशी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. हे तिने तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले, पण त्यांनीही त्यांच्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. याबाबत पतीची बोलायचं प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या तक्रारीवरून एसएचओ आदिती कुमारी यांनी सांगितले की, या प्रकरणी तिच्या पतीसह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. (हेही वाचा: Gujarat Shocker: गर्लफ्रेंडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरात चोरीसाठी घुसलेल्या 20 वर्षीय तरुणाने केली महिलेची हत्या; आरोपीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)