7 ऑक्टोबर पासून नवरात्रीच्या (Navratri 2021 )उत्सवाची सुरुवात झाली आहे.नवरात्रीच्या आठव्या दिवसाला महाष्टमी असेही म्हणतात. देवी दुर्गाची आठवी शक्ती महागौरीची पूजा अष्टमी तिथीला केली जाईल. अष्टमी आणि नवमीला मुलींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या वर्षी, अष्टमीच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ आहे की अष्टमी 13 तारखेला करायची की 14 तारखेला. यंदा शारदीय नवरात्री 8 दिवसांची आली आहे, ज्यामध्ये तृतीया आणि चतुर्थी एकाच दिवशी होती. ज्यामुळे 13 ऑक्टोबरला महाअष्टमी आणि 14 ऑक्टोबर रोजी नवमी येत आहे. उद्या महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे.या दिवशी गुलाबी वस्त्र परिधान करून मातेची पूजा करावी.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)