Vyjayanthimala Dances in Ayodhya: अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर अनेक कलाकार ‘राग सेवे’मध्ये सहभागी होत आहेत. 22 जानेवारीला राम मंदिराचा अभिषेक झाला आणि चार दिवसांनी 26 जानेवारीपासून रामलल्लाची राग सेवा सुरू झाली. रामलल्लाच्या दरबारात 48 दिवस ही राग सेवा सुरू राहणार आहे. नुकतेच काँग्रेसच्या माजी खासदार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला या राग सेवेत सहभागी झाल्या होत्या व त्यांच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 90 वर्षीय अभिनेत्री वैजयंती माला यांनी रामलल्लाच्या मंदिरात राग सेवा दिली. त्यांनी मंदिरात भरतनाट्यम नृत्य केले. या वयात त्या नृत्य करताना पाहून लोक थक्क झाले. वैजयंती माला या देशातील प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहेत. (हेही वाचा: Anant-Radhika Pre Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी पॉप सिंगर Rihanna ने घेतले 75 कोटी रुपये)
हमारे यहां कला भक्ति का सर्वोच्च पद माना गया है, वैजयंतीमाला जी को देखकर यह बात बारबार सच साबित दिखती है। आज भी जो प्रसिद्धि और ग्लैमर नए कलाकारों के लिए सपना है,, उस के सर्वोच्च शिखर को साठ वर्ष पीछे छोड़ #वैजयंतीमाला जी चेन्नई में कला साधना में जीवन यापन कर रही हैं। कल #रामलला… pic.twitter.com/Jb4Xnd0Try
— मालिनी अवस्थी Malini Awasthi (@maliniawasthi) March 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)