उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूर जिल्ह्यातील एका दागिन्यांच्या शोरूममधून लाखो रुपयांचा हार चोरीला गेला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही धक्कादायक बाब समोर आली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा हार एका हाय प्रोफाईल दिसणाऱ्या महिलेने चोरला होता. गोरखपूर जिल्ह्यातील कँट पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या बलदेव प्लाझा येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून नेकलेस सेट चोरीला गेला. दागिन्यांचा एक सेट कमी आढळून आल्याने सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले असता ही घटना उघडकीस आली. एका चांगल्या घरातील दिसणाऱ्या महिलेने आपल्या साडीमध्ये हा नेकलेसचा सेट कसा लपवला हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. (हेही वाचा: Crime: लग्नात मुलीला 1000 तोळे सोने, दीड कोटींची कार दिली भेट, आता जावयाने सासऱ्याला लावला 107 कोटींचा चुना)

महिलेने चोरला नेकलेस- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)