78 व्या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी भारतीय अभिनेत्री रुची गुर्जरने खास नेकलेस परिधान केला होता. यामध्ये परंपरा आणि राष्ट्रीय अभिमानाचा मिलाफ करत तिने नेकलेस मध्ये पीएम नरेंद्र मोदींचा फोटो देखील समाविष्ट केला होता. जयपूरच्या प्रसिद्ध कारागिरीचा सन्मान तिने आपल्या पेहरावात केला होता यामध्ये गुंतागुंतीच्या आरशाच्या कामाने, पारंपारिक गोटा पट्टीने आणि भरतकामाने सजवलेला लेहंगा होता. गळ्यात कमळ्याच्या डिझाईन मधील हारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता. "कान्समध्ये तो नेकलेस परिधान करून, मला आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करायचा होता, ज्यांच्या नेतृत्वाने भारताला नवीन उंचीवर नेले आहे." अशी प्रतिक्रिया रूचीने दिली आहे.

Actress Ruchi Gujjar चा खास नेकलेस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)