Snake Found in AC Coach of Train: गोरखपूर-वांद्रे टर्मिनस वीकली एक्स्प्रेस (15067) च्या एसी-3 टायर बी3 कोचमध्ये प्रवाशांना साप दिसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वृत्ताने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी कोच रिकामा केला आहे आणि त्याच्या जागी दुसरा एसी 3 इकॉनॉमी बसवला. साप असलेला डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आहे. ट्रेन मध्यवर्ती स्थानकावर येताच सापाचा शोध घेण्यात आला. बरीच शोधाशोध करूनही साप दिसला नाही, त्यानंतर एसी कोच बदलण्यात आला. यामुळे ट्रेन सुमारे अडीच तास उशिराने सुटली. काही प्रवाशांनी अधिकाऱ्यांना व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये वरच्या बाजूच्या बर्थवर हाताने टॅप केल्यावर सापाची शेपटी हलताना दिसत होती. लेटेस्टली मराठी या व्हिडिओला दुजोरा देत नाही. अहवालानुसार, बुधवारी गोरखपूरहून वांद्रेला जाणारी गोरखपूर वांद्रे एक्स्प्रेस लखनऊ स्थानकावरून निघताच, बी-3 डब्यातील प्रवासी बिट्टू याला सीट क्रमांक 56 जवळ हा साप दिसला. (हेही वाचा: Drunk Man's Misbehavior With Woman in Train: मद्यधुंद व्यक्तीकडून Visakha Express ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेशी गैरवर्तन, पीडिता जखमी)
पहा व्हिडिओ-
Tail of the snake visible in the video. pic.twitter.com/DqNwFjp8uw
— Arvind Chauhan 💮🛡️ (@Arv_Ind_Chauhan) July 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)