Woman Assaults Traffic Home Guard: हैदराबादच्या पॉश अशा बंजारा हिल्स भागात एका महिलेने ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो रविवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. बंजारा हिल्स येथे चुकीच्या मार्गावर आपली जग्वार कार चालवत असलेल्या महिलेला कर्तव्य बजावत असलेल्या ट्रॅफिक होमगार्डने अडवले, तेव्हा ही महिला चिडली आणि तिच्या मार्गात अडथळा आणल्याबद्दल तिने होमगार्डला शिवीगाळ केली. व्हिडिओवरील टाइमस्टॅम्पनुसार, शनिवारी संध्याकाळी सुमारे 8.24 वाजता हा गोंधळ झाला. आजूबाजूच्या लोकांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरीही ती महिला तिच्या आक्रमकतेवर कायम राहिली. जेव्हा तिने ट्रॅफिक होमगार्डवर शारिरीक हल्ला केला तेव्हा प्रकरण वाढले. धक्कादायक म्हणजे महिलेने होमगार्डचे कपडे फाडले आणि त्याचा फोन हिसकावून घेतला. हल्ल्यानंतर, ट्रॅफिक होमगार्डने ट्रॅफिक होमगार्ड बंजाराहिल्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, मारहाणीची तपशीलवार माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Cockroaches Found In Food Area of Flight: इंडिगो फ्लाइटच्या फूड एरियामध्ये प्रवाशाला आढळली झुरळं; विमान कंपनीने दिली 'अशी' प्रतिक्रिया)
వచ్చిందే రాంగ్ రూట్.. అడిగితే హోమ్ గార్డ్ బట్టలు చింపిన లేడీ
బంజారాహిల్స్ - ట్రాఫిక్ హోమ్ గార్డ్ పై మహిళ వీరంగం. జాగ్వర్ కార్లో రాంగ్ రూట్లో రావడమే కాకుండా అడ్డుకున్న హోంగార్డుపై బూతులు తిడుతూ అతని బట్టలు చింపి దాడి చేసిన మహిళ. కేసు నమోదు చేసిన పోలీసులు. pic.twitter.com/xYvWnndmo1
— Telugu Scribe (@TeluguScribe) February 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)