Cockroaches Found In Food Area of Flight: इंडिगो फ्लाइटच्या फूड एरियामध्ये प्रवाशाला आढळली झुरळं; विमान कंपनीने दिली 'अशी' प्रतिक्रिया
Cockroaches In Indigo flight (PC - X/@shukla_tarun)

Cockroaches Found In Food Area of Flight: इंडिगोच्या फ्लाइट (Indigo Flight) च्या फूड एरिया (Food Area) मध्ये घाणीच्या ढिगाऱ्यावर झुरळं (Cockroaches) रेंगाळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हे दृश्य पाहून हवाई प्रवासी हैराण झाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ इतका अस्वस्थ करणारा आहे की, जो कोणी तो पाहिलं त्याची पुन्हा फ्लाइटमध्ये काहीही खाण्याची इच्छा होणार नाही. विमान कंपन्या त्यांच्या ग्राहकांकडून सेवेच्या नावाखाली चांगली रक्कम वसूल करतात. परंतु, विमानात अशी अस्वच्छता पाहून त्यांचे मन पूर्णपणे अस्वस्थ होते.

इंडिगो फ्लाइटमधील एका प्रवाशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विमानाच्या डायनिंग एरियामध्ये अनेक झुरळं रेंगाळताना दिसत आहेत. पत्रकार तरुण शुक्ला यांनी फ्लाइटमधील झुरळांचा व्हिडिओ शेअर केला. तसेच प्रवाशांना अशा अनुभवांना सामोरे जावे लागू नये यासाठी इंडिगो योग्य उपाययोजना करेल, अशी आशाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. (हेही वाचा -Turbulence on IndiGo's Delhi-Srinagar flight Viral Video: खराब वातावरणामुळे इंडिगो च्या विमानाला आकाशात जोरदार झटके; प्रवाशांसाठी ठरला खतरनाक अनुभव (Watch Video))

व्हिडीओ शेअर करताना तरुण शुक्ला यांनी लिहिलं आहे की, विमानाच्या डायनिंग एरियामध्ये (किंवा त्या बाबतीत कुठेही) झुरळे. हे खरोखरच भयानक आहेत. आशा आहे की इंडिगो आपल्या ताफ्याकडे कठोरपणे लक्ष देईल आणि हे कसे घडले याची चौकशी करेल.

पहा व्हिडिओ - 

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगोने यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. इंडिगोने आपल्या विमानातील एक गलिच्छ कोपरा दर्शविणारा व्हिडिओ कबूल केला. 'आमच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब संबंधित फ्लाईटमध्ये कारवाई केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, आम्ही ताबडतोब संपूर्ण फ्लीटचे निर्जंतुकीकरण केले. तसेच फ्युमिगेशन आणि निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्या,' असंही इंडिगोने पोस्टमध्ये सांगितलं आहे.

IndiGo फ्लाइटमध्ये आम्ही सुरक्षित, त्रासमुक्त अनुभव सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छतेची सर्वोच्च मानके राखतो. आम्ही प्रवाशांना होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, असंही कंपनीने म्हटलं आहे.