रामचरितमानसवरील वादग्रस्त टिप्पणीनंतर बिहारचे शिक्षणमंत्री आणि आरजेडी नेते चंद्रशेखर यादव यांनी आता पुन्हा एकदा भगवान रामाबाबतत वादग्रस्त विधान केले आहे. बिहारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना शिक्षणमंत्री म्हणाले, माझ्या स्वप्नात भगवान राम आले, आणि म्हणाले की लोक मला बाजारात विकत आहेत, मला विकले जाण्यापासून वाचवा. शिक्षणमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारसह इतर राज्यांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. मंत्री चंद्रशेखर यादव यांनी अशी वादग्रस्त विधाने करून प्रभू रामाचा अपमान केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याआधी 14 सप्टेंबर रोजी पाटणा येथील बिहार हिंदी ग्रंथ अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्री चंद्रशेखर यादव यांनी रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाइड असल्याचे सांगितले होते. (हेही वाचा: Cabinet Meeting: संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक; 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)