उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर मध्ये एका लग्न समारंभात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ही घडली आहे. या घटनेंतर 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरी गावात ही घटना घडली. स्थानिक रहिवासी सीताराम यांच्या मुलीचे मंगळवारी लग्न होते. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर तिथे फास्टफूड खाण्याचा ट्रेंड सुरू झाला. काही काळानंतर लोकांची प्रकृती ढासळू लागली. पोटदुखीसोबतच उलट्या, चक्कर येणे अशा समस्या सुरू झाल्या.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)